Rangmahal Palace Chandwad राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला राजवाडा,
Автор: Explore with Dr. Jayant Wadatkar
Загружено: 2025-05-02
Просмотров: 44904
Rangmahal Chandwad Dist Nashik
रंगमहाल चांदवड
नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे गाव आपल्याला माहिती आहे का.? या ठिकाणी राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला भव्य असा राजवाडा आहे. या व्हिडीओ मध्ये आपण हा राजवाडा बघणार आहोत आणि त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
नाशिक इथून जवळपास ६५ किमी अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड हे तालुक्याचे ठिकाण असलेले गाव लागते. टेकड्यांनी वेढलेले हे ठिकाण निसर्गता सुंदर आहे. सुमारे १००० वर्षपूर्वीच्या प्राचीन जैन लेण्या व त्याहून पुरातन मंदिरे असलेले हे गाव इतिहासात फार प्राचीन काळापासून ज्ञात आहे. आज या ठिकाणचे आकर्षण म्हणजे येथील रंगमहाल.
वाड्याच्या समोर भव्य अशी तटबंदी असून कोपऱ्यावर दोन उंच असे बुरुज आहेत. आणि याच्या मध्यभागी आहे ते भव्य असे प्रवेशव्दार. उत्तरमुखी असलेला हा दरवाजा आजही सुस्थितीत असून आत प्रवेश करण्यास लहान खिडकीची व्यवस्था आहे. दरवाज्याची लाकडी कवाडे व त्यावरील मोठाले खिळे आज सुद्धा उरत धडकी भरवितात. आतमध्ये पहारेकर्यांच्या खोल्या असून समोरच मोकळे पटांगण दिसते. या मोकळ्या जागेत उभे राहिलो की समोर दिसतो तो दुमजली वाडा. वाड्याच्या समोरील उंच असा ओसरीचा भाग व तेथील नक्षी युक्त लाकडी खांब बघून, वाडा आतमध्ये किती भव्य व सुंदर असेल याची कल्पना येते. आम्ही गेलो त्यावेळी ये ठिकाणी वाड्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते.
या ओसरीतून आत जाण्यासाठी मध्यभागी एक लाकडी दरवाजा आहे. येथून प्रवेश केला की समोर भव्य असा चौक लागतो. या चौकातून चारही बाजूला व्हरांडा असून त्यात असलेले अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले खांब व तुळया बघून भान हरपून जाते. व्हरांड्याच्या आत अनेक दालने व खोल्या आहेत. येथे आल्यावर ळते की हा वाडा तीन माजली आहे. चौकाच्या समोरच व्हरांड्यात अहिल्याबाईची राजगादी ठेवलेली दिसते. याच्या मागे भिंतीत एका दालनात देव्हारा असून आतमध्ये सुंदर अशा राम सीतेच्या मुर्त्या आहेत. या देव्हार्याच्या बाजूला एका कोनाड्यात अहिल्याबाईचे जलरंगात काढलेले सुंदर असे चित्र आहे.
या वाड्याची निर्मिती १८व्या शतकातील. थोडक्यात इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास सुभेदार मल्हारराव होळकर यांनी उत्तरेत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे मुघलांकडून इ.स. १७५० ला होळकरांना चांदवडची जहांगिरी मिळाली. त्यानंतर मल्हारराव होळकर व पुढे १७६५ पर्यंत राणी अहिल्याबाई होळकर यांनी चांदवड येथे भव्य असा राजवाडा बांधला आणि शहरा भोवताल तटबंदी उभारली. आज तटबंदी शिल्लक नसली तरी वाडा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
हा वाडा एकूण ३२००० चौरस फुट इतक्या मोठ्या जागेत असून असे तीन मजले म्हणजे किती जागा वापरात असेल याची कल्पना करता येऊ शकते. या इमारतीचा पायथा संपूर्ण दगडात बांधलेला असून खांबावर व तुळयावर विविध प्रकारचे नक्षीकाम असून हे कोरीव काम अहमदाबादी पद्धतीचे केलेले आहे. यामध्ये वेलबुट्टी, अनेक प्राणी पक्षी यांची चित्रे कोरलेली दिसतात. वाड्याचे तीन भाग असून समोरील ओसरी व त्यावरील दालन म्हणजे जनतेसाठी खुली असलेली जागा. या ठिकाणी बैठकी व न्यायनिवाडा वगैरे चालत असे. आतमध्ये चौक व त्याभोवती निवास व कार्यालयाच्या खोल्या आणि शेवटी मागील भागात स्वयंपाकघर, भांडार घर अशी दालने होती.
वरच्या मजल्यावर चढण्यासाठी भिंतीतून जिने असून तेथून वर जाता येते. पायऱ्या चढून या वरच्या दालनात आलो की भिंतीवर सर्वत्र अनेक चित्रे काढलेले दिसतात. यावरूनच या वाड्यास रंगमहाल असे नाव पडले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: