संभाजीनगरात भाजप मध्ये आजही ‘राडा’! कराडांना घेराव, शिवीगाळ. सावेंच्या गाडीला काळे फासले. दोघे वाचले
Автор: Rahul Kulkarni Official
Загружено: 2025-12-31
Просмотров: 34193
महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडाळीचा वणवा पेटला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी 'तांडव' केले. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी काळं फासून निषेध नोंदवला, तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी रोखून धरली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, दोन्ही नेत्यांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तिथून पळ काढावा लागला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: