Indus Water Treaty स्थगित केल्यानंतर भारत पाकिस्तानात जाणारं Sindhu Riverचं पाणी कसं अडवणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-04-26
Просмотров: 54680
#BolBhidu #IndusWaterTreaty #SindhuRiver
२२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचा बदला घेणार अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली. २३ एप्रिलला पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा कमिटीची बैठक झाली. त्यात पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, असं बोललं जात होतं. पण या बैठकीनंतर बातम्या आल्या त्या भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक. सिंधू जल करार स्थगित करुन भारत पाकिस्तानचा घसा कोरडा करणार असं बोललं जाऊ लागलं. त्यानंतर पाकिस्तानला मिळणारं सिंधू नदीचं पाणी रोखणं करंच शक्य आहे का, भारताकडं त्यासाठी योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अशा चर्चा व्हायला लागल्या. पण आता याबाबत भारत सरकारकडून एक प्लॅन आखण्यात आलाय.
शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत याबाबत एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी एक मोठं विधान केलं. भारताकडून पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलं. त्यासाठी सरकारकडून तीन टप्पे आणि तीन रणनीती आखण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय. आता भारताचा हा प्लॅन नक्की आहे काय, सिंधू जल करार स्थगित करुन भारत पाकिस्तानची कोंडी कशी करू शकतो आणि त्यामुळं पाकिस्तानवर कसा परिणाम होऊ शकतो, पाहुयात या व्हिडिओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: